Saturday, November 12, 2016

मी सकाळी सकाळी सात वाजताच कुत्र्याला घेवून फिरायला गेलो घराच्या खाली ओबीसी बैंक आहे। बँकेसमोर 200-300 देशभक्त लढत असल्याने त्यात पाच दहा लोक ओळखीचे वाटले आमच्या सोसाइटी मध्ये वॉचमैन होते त्याना विचारले क्या रहे हो इतने सबेरे ? त्यानी उत्तर दिल रात से लाइन में हूँ पांचसो रुपये मिल रहे है लाइन में लगने के इसीलिए हम सब एक साथ खड़े है. चाय पानी पेशाब नास्ते के टाइम १-१ करके जाकर आ रहे है
२००-३०० रुपये रोज मिळवणारे ५०० रुपये रोज कमावत असल्याचे बघुन धन्य झालो
अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे अनेक लोक लाइनीमध्ये राहण्याचा धंधा व्यवस्थित करत आहेत बघुन देश्याच्या अनेक समस्या संपुष्टात आल्याचे ध्यानात आले
मला सुद्धा ह्या युद्धभूमीवर कूच करण्याचा मनसुबा आहे पण पाचशे रुपये रोज देण्याचा विचार नाही अणि हजार पाचशे ची चिल्लर संपेपर्यंत खिंड लढवत राहायचे असा संकल्प आहे हॉस्टल चे दिवसात १-२ रुपये पन सोडत नव्हतो पुनः तेच दिवस आठवले.
दिल्ली मध्ये बैंक अणि एटीएम लूटले म्हणून रैपिड एक्शन फ़ोर्से प्यारा मिलिटरी फ़ोर्से सुद्धा बोलावण्यात आले आहे अशी बातमी आली
पावर इन्टरनेट सर्व व्यवस्थित चलावे हीच इच्छा सर्व देशप्रेमी देश भक्ताना त्रास होवू नये हीच सदिच्छा
देशप्रेम अणि देशभक्ति उमलून आलेल्या सर्व कृत्य कृत्य झालेल्यांचे सर्वांचे अभिनन्दन अभिवादन
आपल्या देशभक्ति चा अभिमान आहे सदसद्विवेक बुद्धि जागृत हो स्वाभिमान जागृत हो

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home